सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

Sunil Sagare
0

 


मूल्यमापन हा शिक्षण प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे. अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन या परस्पर पूरक प्रक्रिया आहेत. महाराष्ट्रातील शालेय शिक्षणामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रक्रिया राबवली जाते.

सात्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या संकल्पनेचा अर्थ त्याच्या नावातच लपलेला आहे.

सातत्यपूर्ण म्हणजे नियमित किंवा सतत म्हणजेच विद्यार्थ्याच्या वर्तन बदलाचे अथवा प्रगतिचे मूल्यमापन शिक्षकांना फक्त सत्राच्या शेवटी न करता वर्षभर सतत करावयाचे आहे. प्रत्येक शैक्षणिक अनुभवानंतर विद्यार्थी मूल्यमापनातून प्रगतीचे मूल्यमापन करून त्यानुसार पुढील अध्यापनाचे नियोजन करावे अशी या प्रक्रियेमध्ये अपेक्षा आहे.

सर्वंकष याचा अर्थ अध्ययन अनुभवाच्या सर्व पैलूंचे मूल्यमापन, म्हणजेच गुणात्मक आणि संख्यात्मक मूल्यमापन यासाठीच या प्रक्रियेमध्ये आकारीक आणि संकलित मूल्यमापन समाविष्ट केले आहे. आकारीक म्हणजे वर्षभर चालणारे मूल्यमापन आणि संकलित म्हणजे सत्राच्या शेवटी होणारे मूल्यमापन होय.


आकारीक मूल्यमापनाची प्रक्रिया

आकारीक मूल्यमापन हे वर्षभर चालते.


आकारीक मूल्यमापनाची साधने

1)  तोंडीकाम

2) उपक्रम व कृती

3) स्वाध्याय

4) गृहपाठ

5) चाचणी

6) प्रकल्प

7) प्रात्यक्षिक व प्रयोग

8) वर्णनात्मक नोंदी


वरील पैकी वर्णनात्मक नोंदी सोडता इतर सर्व साधने संख्यात्मक आहेत म्हणजेच त्यांचे गुणांकन करता येते. तर वर्णनात्मक नोंदी हे साधन गुणात्मक आहे, त्याच्या नोंदी शिक्षकांना शाब्दिक व वर्णनात्मक स्वरुपात विषयवार नोंदवहीमध्ये ठेवाव्या लागतात.

सर्वसाधारणपणे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे(इतिहास, भूगोल इत्यादि), परिसर अभ्यास याविषयांच्या आकारीक मूल्यमापनासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येक सत्रामध्ये कमीत कमी 5 साधने. तर कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी किमान 3 आकारीक मूल्यमापनाची साधने वापरणे आवश्यक आहे.

वरील सर्व साधने वर्गात प्रत्यक्ष अध्यापन करताना वापरुन वरचे वर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्याच्या नोंदी शिक्षकांनी ठेवाव्या लागतात.


संकलित मूल्यमापन प्रक्रिया

संकलित मूल्यमापन हे सत्राच्या शेवटी केले जाते.


संकलित मूल्यमापनाची साधने

1) प्रात्यक्षिक/तोंडी परीक्षा

2) लेखी परीक्षा


आकारिक व संकलित मूल्यमापनाची वर्गावर गुणविभागणी

(मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित, परिसर अभ्यास१ व २, इतिहास व भूगोल साठी)


इयत्ता                         आकारिक मूल्यमापन                    संकलित मूल्यमापन(तोंडी+लेखी)

पहिली-दुसरी                      70  गुण                                                  10 + 20 = 30 गुण

तिसरी-चौथी                       60 गुण                                                   10 + 30 = 40 गुण

पाचवी-सहावी                     50 गुण                                                   10 + 40 = 50 गुण

सातवी-आठवी                    40 गुण                                                   10 + 50 = 60 गुण


टीप: कला, कार्यानुभाव व शारीरिक शिक्षण या विषयांचे आकारिक मूल्यमापन 100 गुणांचे असते.

Download CCE Excel Software

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन  हस्तपुस्तिकेच्या   पीडीएफ साठी येथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top