राज्य सरकारने १० जुलै २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर मिळणारा महागाई भत्ता आता ४६% वरून ५०% झाला आहे. ही वाढ १ जानेवारी पासून लागू करण्यात आली आहे. या निर्णयानुसार सदरील महागाई भत्ता वाढ जून च्या पगारात मिळणार असून सोबत १ जानेवारी २०२४ ते जून २०२४ पर्यंतची थकबाकी सुद्धा देण्याचे निर्देश वित्त विभागाच्या या शासन निर्णयात देण्यात आले आहेत.
१ जानेवारी २०१६ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला. तेंव्हापासून आजपर्यंत केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आजपर्यंत आजपर्यंत १२ वेळा वाढ केली आहे. तर महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू केला. त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ९% वरून १२% करण्यात आला होता.
राज्य सरकारने ८ जुलै २०१९ रोजी शासन निर्णय काढून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील पगारात पहिल्यांदा महागाई भत्ता लागू केला. ही वाढ ९% इतकी होती. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून ५०% इतका आहे.
विविध वेतन आयोगातील यापूर्वीचे महागाई भत्ता वाढ व लागू दिनांक सोबत पी डी एफ फाईल मध्ये उपलब्ध आहेत.
महागाई भत्ता वाढ तक्ता
महागाई भत्ता कसा काढावा?
ऑनलाईन वार्षिक वेतनवाढ कॅल्क्युलेटर
सातवा वेतन आयोग महागाई भत्ता वाढ तक्ता