जनरल रजिस्टर । General Register Excel Software

Sunil Sagare
0
  जनरल रजिस्टर हा शालेय अभिलेखांमधील  सर्वात महत्वाचा अभिलेख आहे. या रजिस्टर मध्ये आजपर्यंत शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची मूलभूत माहिती जसे की नाव, जन्म दिनांक, प्रवेश दिनांक, पूर्वीची शाळा, आईचे नाव, मातृभाषा, जन्म ठिकाण इत्यादी, नोंदलेली असते. याच रजिस्टर च्या आधारे विद्यार्थ्याला बोनाफाईड दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि रजिस्टर उतारा दिला जातो. 
 १९ सप्टेंबर २०१६ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार शालेय जनरल रजिस्टर व शाळा सोडल्याचा दाखला(T. C.) यात सुधारणा करण्यात आली आहे. या नवीन शासन निर्णयानुसार जनरल रजिस्टर मध्ये विद्यार्थ्यांच्या मूलभूत माहिती सोबतच त्याचा स्टुडंट आय डी, व आधार क्रमांक नोंदणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नमुना जनरल रजिस्टर व शाळा सोडल्याचा दाखला या शासन निर्णयासोबत दिलेला आहे.
  या नवीन शासन निर्णयानुसार जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. हे सॉफ्टवेअर एक्सेल फाईल च्या स्वरूपात असून यात जनरल रजिस्टर नंबर टाकल्यास एका क्लिक वर विद्यार्थ्यांचे बोनाफाइड, शाळा सोडल्याचा दाखला व निर्गम उतारा प्रिंट काढता येतो.




जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर ची वैशिट्ये :

 १. जनरल रजिस्टर वर आधारित खालील दाखले एका क्लिक वर प्रिंट काढता येतात.
         अ.   शाळा सोडल्याचा दाखला 
          ब.    निर्गम उतारा 
          क.    बोनाफाइड प्रमाणपत्र 

२.   नवीन शासन निर्णयानुसार दाखले व रजिस्टर नोंदी घेण्याची सोय.

३.   दाखला दिनांक अंकात/अक्षरात आपोआप तयार होतो.

४. वापरण्यास सोपे व सुटसुटीत आहे. 

जनरल रजिस्टर एक्सेल फाईल डाउनलोड करा 

जनरल रजिस्टर सॉफ्ट वेअर कसे वापरावे?

1. सर्वप्रथम जनरल रजिस्टर या शीट मध्ये माहिती भरून घ्यावी.

2. त्यानंतर School Info शीट मध्ये शाळा माहिती भरून घ्यावी.

3. Home शीट वर ज्या विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड/निर्गम
प्रिंट करायचा आहे. त्या विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर क्रमांक, व इतर आवश्यक माहिती 
टाकून खालील बटन/लिंक वर क्लिक करावे. दाखला दिसेल, त्यात माहिती बरोबर असल्याची 
खात्री करावी. व नंतरच दाखल्याची प्रिंट काढावी.

4. सर्व दाखल्यांवर संगणकावरील आजचा दिनांक आपोआप येतो. तो टाइप करून बदलू नये. 
त्यामुळे दिनांकाच्या सेल मधील फॉर्म्युला डिलिट होईल. व दिनांक दिवसाप्रमाणे बदलणार नाही.
दिनांक चुकीचा येत असल्यास दाखल्यावरील दिनांक बदलण्याऐवजी संगणकाच्या सेटिंग 
मधून आजचा  दिनांक दुरुस्त करावा.

5. TC प्रिंट करताना 'मूळप्रत' किंवा 'दुय्यम प्रत' निवडा, बोनाफाईड तयार करताना लिंग, काल दर्शक 
शब्द बदला जसे - कुमार/कुमारी, विद्यार्थी/विद्यार्थिनी, त्याची/तिची, आहे/होता, हे शब्द ड्रॉप डाउन  
मधून निवडा, निर्गम देताना ठिकाण टाका व नंतरच प्रिंट काढा.
यासाठी पहिल्यांदा पासवर्ड टाकून सेल एडिट लॉक काढावे लागते.
सेल अनलॉक पासवर्ड - 12345

General Register excel file Download (Drive Link)

General Register Excel File Download Link (Mega Link)


या फाईल मधील एक्सेल फॉर्मुला बदल झाल्यास फाईल अपेक्षेप्रमाणे काम करणार नाही त्यामुळे, प्रत्यक्ष दाखल्याच्या शीट मध्ये कोणताही बदल होऊ नये म्हणून शीट लॉक केली आहे. मात्र प्रिंट सेटअप साठी रो-कॉलम साईज कमी जास्त करता येते.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top