वार्षिक वेतन वाढ गणक । Online Increment Calculator
सातव्या वेतन आयोगानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षाच्या १ जुलै अथवा भरून दिलेल्या विकल्पातील महिन्यात वार्षिक वेतन वाढ दिली जाते. ही पगार वाढ मूळ वेतनावर दिली जाते. वार्षिक वेतन वाढीसह आपले नवीन मूळ वेतन किती असेल?, एकूण वेतनात किती वाढ होईल? याची प्रत्येक कर्मचाऱ्याला उत्सुकता असते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण वार्षिक वेतन वाढ कशी काढली जाते. याची सविस्तर माहिती घेऊया.
मूळ वेतन
उदा. समजा जून मध्ये जर मूळ वेतन ३५४०० इतके असेल. तर त्याच्या ३% म्हणजे
३५४०० X (३/१००)
=३५४००X ०.०३
=१०६२
पण वरील रक्कम १०० च्या पटीत नाही. येथे ६२ हे ५० पेक्षा जास्त आहे म्हणून याला १०० केल्यास
जून च्या मूळ वेतन मिळवायची रक्कम होईल - ११००
ही रक्कम आता जून च्या मूळ वेतनात मिळवूया
३५४०० + ११०० = ३६५००
म्हणजेच जून मध्ये ३५४०० रु इतके मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याचे वार्षिक वेतन वाढीसह जुलै महिन्याचे नवीन मूळ वेतन असेल ३६५०० इतके.
अशा प्रकारे सातव्या वेतन आयोगात पे मॅट्रिक्स शिवाय ही आपण सहज सोप्या पद्धतीने वार्षिक वेतन वाढ काढू शकतो.
ऑनलाईन वार्षिक वेतन वाढ कॅल्क्युलेटर
महागाई भत्ता
मूळ वेतन बदलल्यामुळे महागाई भत्ताही नवीन मूळ वेतनावर काढला जातो. त्यामुळे त्यातही वाढ होते. ३० जून २०२३ च्या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ४२% महागाई भत्ता लागू आहे. त्यामुळे वेतन वाढीनंतरचा महागाई भत्ता खालील प्रमाणे असेल.
वेतन वाढीनंतरचा महागाई भत्ता हा नवीन मूळ वेतनाच्या ४२% असेल.
म्हणून महागाई भत्ता = ३६५००X (४२/१००)
= ३६५००X ०.४२
=१५३३० रु.