महागाई भत्ता वाढ तक्ता pdf : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ; आता 50% झाला

Sunil Sagare
0

महाराष्ट्र सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, १ जानेवारी २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६ % वरून ५०% करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ३० लाख शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.

शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३० जून, २०२४ या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै, २०२४ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

या निर्णयाचे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. 


महागाई भत्ता वाढ शासन निर्णय PDF

महागाई भत्ता जेंव्हा ५०% मर्यादा ओलांडेल तेंव्हा तेंव्हा घरभाडे भत्ता टक्केवारी १ ने वाढून ती  मूळ वेतनाच्या  शहरांच्या प्रकारानुसार अनुक्रमे ३०%, २०% व १०% इतकी होईल.

घरभाडे भत्ता शासन निर्णय 2019

महागाई भत्त्याच्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना होणार फायदा

महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ वेतन १०,००० रुपये असेल, तर त्याला सध्या ४६% महागाई भत्ता मिळतो. त्यामुळे त्याचा महागाई भत्ता ४६०० रुपये असतो. महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे त्याचा महागाई भत्ता ५००० रुपये होईल. म्हणजेच, त्याच्या पगारात ४०० रुपये वाढ होईल.

महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना खर्च भागवणे सोपे होईल. तसेच, त्यांचा राहणीमान सुधारेल.

महागाई भत्ता वाढींमुळे आपल्या एकूण वेतनामध्ये नेमकी किती वाढ होईल. ते पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व नवीन महागाई भत्त्यानुसार आपले वाढीव वेतन पहा. 


महागाई भत्ता वाढ गणक । DA Calculator 


सातवा वेतन आयोग महागाई भत्ता वाढ तक्ता


अ.न. लागू दिनांक महागाई भत्ता दर शासन निर्णय दिनांक
१. १ जानेवारी २०१६ ०% १ फेब्रुवारी २०१९
२. १ जुलै २०१६ २% १ फेब्रुवारी २०१९
३. १ जानेवारी २०१७ ४% १ फेब्रुवारी २०१९
४. १ जुलै २०१७ ५% १ फेब्रुवारी २०१९
५. १ जानेवारी २०१८ ७% १ फेब्रुवारी २०१९
६. १ जुलै २०१८ ९% १ फेब्रुवारी २०१९
७. १ जानेवारी २०१९ १२% ८ जुलै २०१९
८. १ जुलै २०१९ १७% ४ जानेवारी २०२०
९. १ जुलै २०२१ ३१% ३० मार्च २०२२
१०. १ जानेवारी २०२२ ३४% १७ ऑगस्ट २०२२
११. १ जुलै २०२२ ३८% १० जानेवारी २०२३
१२. १ जानेवारी २०२३ ४२% ३० जून २०२३
१२. १ जुलै २०२३ ४६% २३ नोव्हेंबर २०२३
१३. १ जानेवारी २०२४ ५०% १० जुलै २०२४

महागाई भत्ता वाढ तक्ता pdf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top