मूलभूत वाचन-लेखन कौशल्य, २१ व्या शतकातील कौशल्ये, जीवन कौशल्यावर आधारित प्रगतीपत्रकावर करावयाच्या वर्णनात्मक नोंदी
- वाचनात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
- आत्मविश्वासाने आणि अस्खलित पणे वाचू शकतो.
- वाचन गती आणि अचूकता वाढली आहे.
- विद्यार्थी विविध प्रकारचे वाचन साहित्य उत्साहाने वाचतो.
- वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजून घेण्यास सक्षम आहे.
- वाचलेल्या मजकुरावर चर्चा करण्यास सक्षम आहे.
- लेखनात लक्षणीय प्रगती केली आहे.
- स्पष्ट आणि सुसंगत वाक्य लिहू शकतो.
- कथा, निबंध, पत्रअसे विविध प्रकारचे लेखन प्रकार वापरू शकतो.
- लेखनात व्याकरणाचे नियम योग्यरीत्या वापरतो.
- गणिताच्या मुलभूत संकल्पना समजून घेतल्या आहेत.
- मुलभूत गणिती क्रिया अचूक करू शकतो.
- एकाच गणित वेगवेगळ्या प्रकारे सोडवू शकतो.
- निसर्गातील विविध घटकांचे निरीक्षण करू शकतो.
- निसर्गातील विविध घटकांचे वर्गीकरण करू शकतो.
- वैज्ञानिक प्रयोग करून त्यांचे निष्कर्ष नोंदवू शकतो.
- विज्ञान विषयातील नवीन माहिती शिकण्यास उत्सुक असतो.
- विविध संस्कृती आणि समाजाबद्दल आदर दाखवतो.
- नागरिक म्हणून जबाबदार्या समजून घेतो व त्यांचे पालन करतो.
- सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूक आहे.
- वर्गात सक्रीय सहभाग घेतो.
- वर्गातील चर्चेत योगदान देतो.
- इतर विद्यार्थ्यांशी आदर आणि सहकार्याने वागतो.
- शाळेच्या नियमांचे पालन करतो.
- शिस्तबद्ध वर्तन करतो.
- विद्यार्थी जबाबदार आणि विश्वासार्ह आहे.
- विद्यार्थी कलाकौशल्यामध्ये उत्कृष्ट आहे.
- क्रीडास्पर्धा आणि खेळामध्ये सक्रीय आहे.
- संगीत आणि नृत्यात कौशल्य दाखवतो.
- नेतृत्वगुण दाखवतो.
- इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो.
- विद्यार्थी समस्या ओळखू शकतो.
- समस्या ओळखून त्या सोडवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधू शकतो.
- तर्कशुद्ध विचार करतो.
- परिस्थितीनुसार निर्णय घेतो.
- हार न मानता चिकाटीने प्रतत्न करतो.
- सामुहिक प्रकल्पांमध्ये सहकार्य करतो.
- सामुहिक उपक्रमामध्ये जबाबदाऱ्या पार पडतो.
- इतर विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यास तत्पर असतो.
- नेतृत्वाची भूमिका घेतो आणि इतरांना प्रेरणा देतो.
- विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढला आहे.
- विद्यार्थी नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक आहे.
- वर्गात सक्रीय सहभाग घेतो.
- आपली मते स्पष्टपणे मांडतो.
- चांगल्या कार्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतो.
- अभ्यासासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करतो.
- माहिती शोधण्यासाठी इंटरनेट चा वापर करतो.
- माहिती सादर करण्यासाठी संगणकाचा वापर करतो.
- माहिती संकलन आणि सदरीकारानासाठी संगणक व इंटरनेट वापरतो.
- मोठी वाक्ये आणि कठीण शब्द सहजतेने वाचतो.
- छोटी कथा,निबंध आणि पत्र स्वच्च्छ आणि सुबोधपणे लिहितो.
- कला आणि वस्तूनिर्मिती कौशल्य खूप सुधारले आहे.
- विद्यार्थी वर्गातील एक आदर्श नेता आहे.
- अभ्यासात इतर विद्यार्थ्यांना मदत करतो.
- वर्गातील वातावरण मैत्रीपूर्ण ठेवतो.
- एखाद्या गोष्टीसाठी यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करतो.
- आव्हानांवर मात करण्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास दाखवतो.
- विद्यार्थी चांगले बोलतो.
- इतर विद्यार्थ्यांशी प्रभावी संप्रेषण करतो.
- विद्यार्थी उत्तम निरीक्षक आहे.
- विविध गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करतो.
- शाळेत शिकवलेल्या गोष्टींचा स्वतंत्रपणे अभ्यास करतो.
- विद्यार्थ्याची कल्पकता खूप चांगली आहे.
- इतर लोकांच्या भावनांबद्दल संवेदनशील आहे.
ही यादी केवळ मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्याच्या गरजेनुसार यात बदल करणे आवश्यक आहे.
पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास आणि आवश्यक त्या सुधारणा करण्यास मदत करणे गरजेचे आहे.
पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास आणि आवश्यक त्या सुधारणा करण्यास मदत करणे गरजेचे आहे.