विद्यार्थी हजेरी पत्रक | students attendance sheet in excel

Sunil Sagare
0

 

शाळेसाठी उपस्थिती पत्र तयार करण्यासाठी एक्सेल नमुना! 



आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती मांडून ठेवणे शिक्षकांसाठी खूप महत्वाचे असते. उपस्थितीची नोंद ठेवणे सोपे करण्यासाठी, आपण एक्सेल (Excel) स्प्रेडशीटचा वापर करू शकता. या पेज आपल्याला विद्यार्थ्यांची उपस्थिती मांडून ठेवण्यासाठी नमूना एक्सेल स्प्रेडशीट उपलब्ध करून दिली आहे.


वैशिष्ट्ये –
१.    हजर दिवस,गैरहजर दिवस, मुले/मुली पट, जातवार पट, सरासरी, जातवार सरासरी,
      विद्यार्थ्याचे महिना अखेरचे वय(वर्ष,महिना,दिवस) इ. सर्व आपोआप तयार होते.
२.    वर्षभराचे सॉफ्टवेअर- मागिल महिन्यातील सर्व विद्यार्थी माहिती पुढिल महिन्यात आपोआप येते.
३.    मागिल सर्व दिवसाचे हजर दिवस चालु महिन्यात आपोआप add केले जातात.


कसे वापरावे?

 १.  एक्सेल शीट ची झुम लेवल 110 % पेक्षा कमी ठेवू नका( एक्सेल मध्ये खालील डाव्या बाजुला झुम बार आहे)
 २.  विद्यार्थी नावापुढे M / F टाइप केल्यानंतरच सॉफ्टवेयर संख्या मोजते,
 ३.  विद्यार्थी नावे युनिकोड मध्येच टाइप करा.
 ४.  सॉफ्टवेअरमध्ये जातवार पट बरोबर येण्यासाठी धर्म व जात या कॉलममध्ये जात न टाकता,
कोणतेही टिंब न टाकता सलग इंग्रजित जात संवर्ग टाइप करा- जसे open , obc, sc, st, nt इ.(याव्यतिरिक्त इतर संवर्ग count होत नाहीत)
* हजर विद्यार्थ्या साथी P व गैरहजर साठी A टाइप करावे.
* विद्यार्थी सकाळाच्या सत्रात हजर राहिल्यास एक दिवस हजर मोजला जातो.
 ५. हे सॉफ्टवेअर फक्त ४५ विद्यार्थ्यासाठीच आहे.
 ६. आकार मोठा असल्यामुळे सामान्य कागदावर print setup होत नाही


फायदे :

  • उपस्थिती माहितीची नोंद ठेवणे सोपे आणि जलद होते.
  • मासिक किंवा त्रैमासिक सारांश तयार करणे सोपे.
  • विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा डेटा विश्लेषण (Data विश्लेषण) करणे शक्य.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top