नवीन बदल काय ?
१ . प्रत्येक महिन्याचा मेनू सेट करण्यासाठी स्वतंत्र एक्सेल शीट या नवीन एक्सेल सॉफ्टवेअर मध्ये देण्यात आली आहे . १ ते ५ व आणि ६ ते ८ साठी सुद्धा वेगवेगळी मेनू शीत दिलेली आहे .
२ . महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक दिवसासाठी च्या मेनू चे नाव व प्रत्येक धान्य / मसाला यांचे प्रमाण सेट करून ठेवता येईल .
३ . एकाच दिवशी अनेक कडधान्ये खर्च टाकण्याची सोय यात देण्यात आली आहे .
४ . नोंदवही भाग १ मध्ये ताटांची संख्या टाकावी . नोंदवही भाग २ मध्ये सर्व नोंदी आपोआप होतील .
५ . जुन्या एक्सेल फाईल मधील माहे एप्रिल पासून ची माहिती या शीट मध्ये घेणे गरजेचे आहे .
खालील लिंक वर क्लिक करून आपण नवीन एक्सेल फाईल डाउनलोड करू शकता .
जुन्या फाईल मधून नवीन फाईल मध्ये माहिती कशी घ्यावी ?
१ . सुरुवातीला नवीन फाईल मध्ये प्रत्येक महिन्याचा दर रोजचा मेनू व त्यांचे प्रमाण सेट करावे . ( माहे एप्रिल ते आजतगायत) किंवा जुन्या फाईल मध्ये आठवड्यानुसार कॉपी पेस्ट करावीत .
२ . वरील प्रमाणे प्रत्येक महिन्याचा व प्रत्येक इयत्तांचा मेनू सेट केल्यानंतर नोंदवही भाग १ मध्ये प्रत्येक महिन्याचे ताटांची संख्या व प्राप्त तांदूळ कॉपी करून पेस्ट करावा . पेस्ट करताना अंकांची लिंक (फॉर्मुला ) पेस्ट होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रत्यक्ष संख्या पेस्ट कराव्यात .
३ . आजपर्यंचा प्राप्त धान्य नोंदवही भाग २ मध्ये कॉपी पेस्ट करावे .
४ . सर्व माहिती कॉपी पेस्ट केल्यानंतर प्रत्येक महिना अखेर शिल्लक साठा प्रत्यक्ष प्रिंट नोंदवही सोबत पडताळून पाहावा . काही चुका असल्यास एप्रिल सुरुवातीची शिल्लक , मेनू शीट, टाटांची संख्या आणि प्राप्त धान्य तपासून पाहावे .
एक्सेल फाईल डाउनलोड करण्यासाठी पर्यायी लिंक -> DOWNLOAD