कसे वापरावे?
१.मूळ वेतन टाका.
२. महागाई भत्ता टक्केवारी निवडा.
३. घरभाडे टक्केवारी निवडा.
४. प्रवास भत्ता निवडा.
५. कॅल्क्युलेट बटन क्लिक करा.
बटनाखाली वार्षिक वेतन वाढीसह सविस्तर नवीन पगाराचे आकडे येतील.
वाचा:महागाई भत्ता वाढ तक्ता pdf: सातवा वेतन आयोग महागाई भत्ता शासन निर्णय दिनांक व लागू दिनांक तक्ता
वार्षिक वेतन वाढ कॅल्क्युलेटर । varshik vetan vadh Calculator
अंक टाईप होत नसल्यास पर्यायी कॅल्क्युलेटर साठी येथे क्लिक करा.
वाचा:वार्षिक वेतन वाढ काढणे.
वार्षिक वेतन वाढ फॉर्मुला :
वरील कॅल्क्युलेटर मध्ये वार्षिक वेतन वाढ काढण्यासाठी जो फॉर्मुला वापरला आहे. त्यानुसार वाढीपूर्वीच्या बेसिक पगाराला ०.०३ ते गुणाकार करावा. अथवा त्याची ३ % काढावी. मात्र ती जशीच्या तशी न घेता त्याला जवळील शंभर च्या पटीत करावे व ही संख्या वाढीपूर्वीच्या बेसिक पगारात मिळवावे.
वरील प्रमाणे नवीन बेसिक पगार काढल्यानंतर त्यानुसार महागाई भत्ता व घरभाडे काढता येईल.
घरभाडे टक्केवारी कोणती निवडावी ?
चालू शासन नियमानुसार ग्रामीण व लहान शहरांमध्ये बेसीक वेतनाच्या ९%, मोठ्या शहरांमध्ये बेसिक वेतनाच्या १८% तर महानगरांमध्ये बेसिक वेतनाच्या २७% प्रमाणे घरभाडे देय आहे. महागाई भत्ता दर ५०% पेक्षा जास्त वाढल्यास हाच दर अनुक्रमे १०%, २०%, व ३०% होईल.
माझा प्रवास भत्ता किती आहे ?
२० एप्रिल २०२२ च्या शासन निर्णयानुसार देय प्रवास भत्ता खालील प्रमाणे आहे.
वेतन स्तर | बृहन्मुंबई/पुणे/नागपूर | इतर शहरे |
---|---|---|
एस-१ ते एस-६ | १००० | ६७५ |
एस-७ ते एस-१९ | २७०० | १३५० |
एस-२० व पुढील | ५४०० | २७०० |
अपंग कर्मचाऱ्यांसाठी हे दर खालील प्रमाणे आहेत.
वेतन स्तर | बृहन्मुंबई/पुणे/नागपूर | इतर शहरे |
---|---|---|
एस-१ ते एस-६ | २२५० | २२५० |
एस-७ ते एस-१९ | ५४०० | २७०० |
एस-२० व पुढील | १०८०० | ५४०० |
फारच सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय छान
उत्तर द्याहटवाNice sirji
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाNice calculater and SMC software Sir
हटवाEverything is good imformation 💯😀